होय! मी मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, बिघडलेले कोलेस्ट्रॉल, निद्रानाश यांच्यावर यशस्वी मात केली आहे !!

अवघ्या आठ महिन्यांत मी या पाचही आजारांमधून पूर्णपणे बाहेर पडलो. यासाठी मला शून्य रुपये खर्च करावा लागला.

Before: October-2022

After: October 2023

नमस्कार, मी सदानंद कुलकर्णी, पुणे.

२०२२ साली मला मधुमेह, उच्च रक्तदाब, बिघडलेले कोलेस्ट्रॉल, निद्रानाश या आजारांचे निदान झाले होते. वाढलेले वजन सोबतीला होतेच. औषधयोजना देऊन डॉक्टरनी त्यांची जबाबदारी पार पाडली होती. पण आपल्याला हे आजार का झाले? त्यांचे मूळ कारण काय आहे? शरीरात कोणते जैवरासायनिक बदल झाल्यामुळे हे आजार होतात? त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत? यातून बाहेर पडण्याचा काही शाश्वत मार्ग आहे का? याचा शास्त्रीय शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. यासाठी वैद्यकीय संशोधन करणाऱ्या जगभरातील विविध प्रतिष्ठित संस्थांनी प्रसिद्ध केलेले शोधनिबंध वाचले. त्यांनी काढलेले शास्त्रीय निष्कर्ष समजून घेतले तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की, दीर्घकाळ सुरु असलेला सदोष, असंतुलित आहार आणि सदोष दिनचर्या हे या असाध्य आजारांच्या मागील मुख्य गुप्त सूत्रधार आहेत.

पण मी तर पूर्ण निर्व्यसनी, शाकाहारी आहे. आजवर कमी तेल-तूप असलेलाच आहार मी घेत होतो. दिवसाला फक्त दोन कप चहा घेत होतो. गोड-धोड फक्त सणावाराला खाण्यात येत होते. फास्ट फूड, जंक फूड यांच्यापासून मी आधीच कटाक्षाने चार हात दूर होतो. असे असूनही आपला आहार चुकीचा कसा? हे समजत नव्हते. त्याच्या मुळाशी जाण्याचे मी ठरवले. 

या आजारांच्या विळख्यातून बाहेर पाडण्यासाठी औषधोपचाराव्यतिरिक्त मी आणखी काय करू शकतो याचा शोध सुरूच होता. तेंव्हा ‘आजारांतून बरे होण्यासाठी आपले शरीर स्वतः अहोरात्र प्रयत्न करत असते. त्यासाठीची भक्कम यंत्रणा शरीरात जन्मजात असते. या यंत्रणेला आणि शरीर करत असलेल्या प्रयत्नांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे’ या सिद्धांताचा मला बोध झाला. मी याचा आणखी अभ्यास केला तेंव्हा हाच सिद्धांत मला या आजारांतून सोडवू शकेल याची खात्री पटली, त्यानंतर त्याचे अनुसरण करण्याचे मी ठरवले. रोगमुक्तीसाठी शरीर करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मी प्रथम स्वतःचा आहार, विहार आणि दिनचर्या यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि विश्लेषण केले. त्यातील दोष हेरले. शरीराच्या मूलभूत गरजा आणि आपले प्रत्यक्ष वर्तन यात मोठी तफावत आहे असे मला दिसून आले. वरवर निर्दोष, किरकोळ वाटणाऱ्या सवयीसुद्धा किती दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात हे माझ्या लक्षात आले. त्यात मी सुधारणा घडवून आणल्या. आहारात आणि सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंतच्या दिनक्रमात अनेक लहान-मोठे बदल घडवून आणले. त्यातून मी स्वतःची ‘सेल्फ हीलिंग लाईफस्टाईल’ निर्धारित केली, तिचे एक वर्ष सजगतेने पालन करण्याचे ठरवले. मला सांगण्यास आनंद होतो आहे की त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत मी मधुमेह, उच्च रक्तदाब, बिघडलेले कोलेस्ट्रॉल, निद्रानाश, स्थूलत्व या पाचही आजारांमधून पूर्णपणे बाहेर पडलो. यासाठी मला शून्य रुपये खर्च करावा लागला. आज मी निरोगी जीवन जगत आहे.

‘आजारांचे निदान होणे ते आजारांतून मुक्त होणे’ या एक वर्षाच्या वाटचालीचा विस्तृत वृत्तांत म्हणजे हे मी लिहिलेले हे ई-बुक आहे. यामध्ये आजारांच्या मूळ कारणांचा शोध मी कसा घेतला? दिनचर्येमध्ये मूळ कारणांचे उगमस्थान कसे शोधले? आणि त्यावर विना खर्चिक उपाय काय आणि कसे केले? याचे विस्तृत विवेचन केले आहे. शाश्वत मार्गाचा अवलंब करून निरोगी जीवन जगण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ई-बुकच्या माध्यमातून नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे.

आणि मी

मधुमेह उच्चरक्तदाब स्थूलत्व निद्रानाश

यांच्या मगरमिठीतून

मुक्त झालो!

एका यशोगाथेचा सविस्तर वृत्तांत

लेखक: सदानंद कुलकर्णी

PDF E-book ● भाषा: मराठी

पृष्ठ संख्या- १०० ● मूल्य ९९ रुपये

ई-बुकचा डेमो डाउनलोड करा. (27 पेजेस)

ई बुक खरेदी करा

पेमेंटसाठी QR कोड

मोबाईल फोन मध्ये Gmail ID असा शोधा...

01
03

Published and Marketed by:
Digital Canvas
G-506 DSK Vishwa, Dhayari Pune 411041.